नशा ही अशी चढावी
प्यालात मज तु दिसावी
पिताच घोट मी धुंद व्हावे
शब्दांनीच सारी मैफ़ल रंगवावी
प्यालात मज तु दिसावी
पिताच घोट मी धुंद व्हावे
शब्दांनीच सारी मैफ़ल रंगवावी
———————————————————
भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही
———————————————————
नजरेतुनच वार झाला
काय तीची ती अदा होती
निशब्द या माझ्या गीतावर
हाय, तेव्हा मैफ़ीलही फ़िदा होती
काय तीची ती अदा होती
निशब्द या माझ्या गीतावर
हाय, तेव्हा मैफ़ीलही फ़िदा होती
———————————————————
काय हा मुका आकांत मनाचा
आसवेही माझ्या काबुत नाही
जखमा पहाया सारे बघेच आले
सात्वंना कुणाचीच शाबुत नाही
आसवेही माझ्या काबुत नाही
जखमा पहाया सारे बघेच आले
सात्वंना कुणाचीच शाबुत नाही
———————————————————
सरले एकेक क्षण माझ्या आयुष्याचे
श्र्वास माझ्या मालकीचे उरलेच नाही
म्हणे मी बेवारस होतो मैफ़ीलीत या
म्हणोनी प्रेत माझे कुणी पुरलेच नाही
श्र्वास माझ्या मालकीचे उरलेच नाही
म्हणे मी बेवारस होतो मैफ़ीलीत या
म्हणोनी प्रेत माझे कुणी पुरलेच नाही
———————————————————
कोडगाच ठरतो वार वेदनांचा
दुख:ही जालीम जहर देत नाही
निविर्कार सागरापरी संथ मी
मज जगण्याचीही लहर येत नाही
दुख:ही जालीम जहर देत नाही
निविर्कार सागरापरी संथ मी
मज जगण्याचीही लहर येत नाही
———————————————————
का हा आरोप मजवर होतो ?
फरारी मी तरी घरंदाज आहे
पुढल्या क्षणी आकाश संपणार
का?,हाही फक्त माझा अंदाज आहे
फरारी मी तरी घरंदाज आहे
पुढल्या क्षणी आकाश संपणार
का?,हाही फक्त माझा अंदाज आहे
———————————————————
