मे 28, 2008 at 9:57 सकाळी (कविता)
सरकले रे आभाळ
माझ्यातल्या अस्तित्वाचे
तृप्त, विक्षीप्त मनाचे
सामोरी आले ते
चंद नाद, रंग, गंध,
सळसळणारे गुज मंद
कधी शात, कधी भयाण
सय ती मुक्त भणाण
आता तु भरुन आल्यावर
किंचीत भीती दाटते?
हरण्याची, स्वत: हरवण्याची
माझ्यासवे तुझ्यातही कुणी
कशाला आणि का रंगावे ?
रे अंधारा मी रंगलो….
तुझ्यात की माझ्यातच?
–सचिन काकडे [ मे २८,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
मे 23, 2008 at 1:48 pm (कविता)
तु म्हणाला होतास ना..??
-कलियुग येईल,
रक्त-रक्त वैरी होइल..
झाले ईश्वरा अगदी तसेच झाले
तुझ्या म्हणण्याप्रमाणे, शब्दांप्रमाणे
आणि त्याचे पुरावेही कधीच मिळाले
पण सांग हे कुठवरं चालणार?
मी तरी कुठवर मलाच मारणार?
रे ईश्वरा हा सवाल नाही
हा आकांत आहे माझा
माझ्यातल्या माणसाचा
आज उत्तर नको मला
मला तुझा नवा अंश हवाय..
तुझा कलयुगी वंश हवाय…
त्या जुन्या गोष्टि कधीच गंजल्यात
गर्द, किर्र तिमिरात रंगल्यात
त्याच उग्र त्या कुंद हवेने
इथं सारखा श्वास कोंडतो
ज्या हातात केली माणुसकी
त्याच हातांनी मी विश्वास सांडतो
साकळतो काळ पुन्हा घात
पुन्हा रक्त, आक्रोश, आकांत
पळभर इथं वादळ उठतं
होते पुन्हा आकाशही शांत
प्रेम, नातंही हेही फ़क्त व्यर्थ बात
आज शब्दालाही काहीच मोल नाही
नजरेनेही हे सहज पहावे
खरंच रे मन ईतकंही खोल नाही
या मनाचीही रचना तुझीच
रचनेमागची ईछ्चाही तुझीच
आज त्याच ईछ्चेने जागा हो
बदलुन टाक तुझी सुत्र, तुझे नियम,
दे पुन्हा शाती, दे फ़क्त संयम
खरच ईश्वरा या हाकेला साद दे…..
या युगाचा आता अंत नको पाहु
आज मला नवा तु धर्म दे…..
घे ईश्वरा, ईश्वरा पुन्हा जन्म घे…..
–सचिन काकडे [ मे २3,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
मे 22, 2008 at 2:02 pm (कविता)
मन नेहमीच अस्थिर
अगदी गोंधळलेल्या वाटांसारखं…
थोड्याश्या साशंक तरीही
मस्तीत उधाणत्या लांटासारख….
किना-याला छेदुन पुढं
निघण्याचा उगाचचा प्रयत्न…
धरेच्या पदराला स्पर्श करुन
गगनास भिडण्याचं वेगळंच स्वप्न…
अन, तेव्हाच नकळत समोर येतो
तोच नेहमीचा व्यवहारीकतेचा प्रश्न…
खरेपणाचा, वास्तवाचा…
आपल्या दुनियेत कीतीही
धुंदीत उधळलं तरी लाटांना
इथं थांबावच लागतं……
पुनवेच्या चंद्राची मर्जी राखुन
त्या फ़ेसाळत्या शांततेत
त्या अस्वस्थेत जागावं लागतं…..
लिहुन ठेवलेल्या नियमांच्या,
बंधनाच्या त्या कड्यात
ती असह्य वाहत राहते…
बंधनांचं ते जुलमी वागणं फ़क्त
मुक्या नजरेने पाहत राहते…
अजुनही ती अशीच जगते
क्षणभर का होईना पण
निर्मळ मनानं स्वप्न बघते
तर मग या वेड्या
मनांच एवढं काय वेगळं ?
तेही असचं कधीना कधी थांबत
नकळत तेही या बंधनात अडकतं..
तरी आपल्याचं नशेत उधळतं
अन, मुद्दामच या लाटांचा हात धरतं…..
–सचिन काकडे [ मे २२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
मे 14, 2008 at 12:39 pm (कविता)
घन तुझ्या आठवांचा आज बरसात करे
मन होउनीया पाणी आज अंगणात झरे
मज नको ती कहाणी, नको पुन्हा तीच गाणी
सर ओली, तो शहारा गात अंतरात फिरे
होई आवाज कापरा संग थरथरे धरा
धरा धरा रे चांदणे, जरा आभाळ सावरा
अशी विझेल ही रात पुन्हा भरतील डोळे
बघ आसवे निघाली पुन्हा जपत चेहरे
मनी फिरते पाखरु त्याचे हरवले घर
त्याची भिजते नजर संग ओलावले पर
काजळाचा रंग त्याच्या काळजात मिळे
तव गंध काजळाचा सा-या रानात पसरे
जरा दाटतो काळोख जरा पुसतो ओळख
क्षणभर दावी खुणा विजांचा मालक
तिचे वाजते पाऊल तशी लागते चाहुल
उधळती येत रात, पुन्हा क्षणात ओसरे
मन भिजले भिजले सवे भिजला पाउस
रात सांगे पावसाला नको एकला गाउस
तिथं छेडलीस तार इथं मीही बिथरले
एक घाव त्या सुराचा माझ्या हृदयात उरे
–सचिन काकडे [ मे १४,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
मे 14, 2008 at 12:38 pm (कविता)
कट्ट्यावर जमली पोर वल्ली
दोघं होती आधीच टल्ली
बाकीच्यांचे वांदे होते
खिशात होती नोट नल्ली
पिंट्या, विज्या, सम्या, मन्या
बघता-बघता पार्टी वाढली
दिन्या आमचा अकाऊंटमास्टर
नेमकीच मोजुन कॉंट्री पाडली
वश्यानं बाईकचा टाकला गियर
आणायाला निघाला वीस-एक बियर
चकण्याचा मात्र पत्ता नव्हता
दिन्याचा हिशोब लागत नव्हता
काही तरी झोल करुयात
मन्या खरच सीरीयस झाला
अब्दुल चाचाच्या कोंबड्य़ा चोरु
ऑप्शन नाहीये सांगता कुणाला?
नको-नको म्हणत सम्या उठला
अरे रावडी आहे अब्दुल चाचा
त्याला पाहुन जातेच वाचा
अरे,मागच्या वेळेला मजबुत पडली
अन तो माझ्यावरचा अन्याय पाहुन
ती एक किलोची कोंबडीही रडली
संत्या उठला काही नाही होत
आज मी व्यवस्थित फ़िल्डींग लावणार
एक दोन नको आज चौघंजण जाऊ
आपण आज फ़क्त चिकन खाणार
आवाज निघताच तयार सगळे
पण हवा सगळ्यांचीच टाईट होती
चौकात होता पार अंधार
आणि मनस्थितीही वाईट होती
तिथं चाचालाही खबर लागली
त्यानीही केलं प्लानिंग सेट
आयतेच तावडीत आम्ही सापडलो
सगळेच झालो चेक ऍंड मेट
एनवेळी कल्टी मारायला
खरतर आमचए हिरो उस्ताद होते
पण आज पडलेल्या पहील्या बॉलवर
धावा शुन्य अन दोन गडी बाद होते
पिंट्या सापडला, रव्याला तोडला
दिन्यालाही निबार हाणला
हे वादळ थांबणार नाही
सत्यानही नेमका मुद्दा जाणला
सम्याला तर पार फ़ोडला
शर्ट फ़ाडुन तसाच सोड्ला
सम्या नुसता कण्हत होता
साल्यानं माझा दात पाडला
असं काहीतरी म्हणत होता
मोडुन सारे वीर परतले
कट्ट्यालाच टेकुन बसले
एकेकाने बीयर घेतली
विदाआऊट चकना घश्यात ओतली
एफ़ एम लावत वश्या हसला
साला चकण्यासाठी साठी एवढा मार
रव्याचा सुर “च्यायला बघ ना”
बॅअकग्राउंड्ला म्युझिक नमस्ते लंडन
चकना, चकना,, चकना………
–सचिन काकडे [ मे १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
मे 10, 2008 at 7:35 सकाळी (कविता)
स्वातंत्र्यसंग्रामाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव [स्मरण १८५७ चे]
देशासाठी, धर्मासाठी
मातीवरल्या प्रेमापोटी
सुटली मंगलची गोळी
तेजातुन त्या रक्त चमकले
चारी दिशांनी मंगलच्या
नंतर त्याच गिरविल्या ओळी
बंडखोरीचा वार होताच
गो-यांनी त्रागा केला
गर्जुन उठत्या ठीणगीने
सारा देश जागा केला
चेतसिंह,तात्या
सुलतान टीपु
पेटुन उठले सारे वीर
तलवारींसह विजा चमकल्या
अंगी खवळले तप्त रुधीर
कर्नाटक, प्लासी,
अवध,दख्खन,अन झाशी
डोळे पुसणारी गंगा दिसली
तेजाळली तव आशा नवी
नव्या उषेची कीरणे हसली
देशावरच्या, मातीवरच्या
प्रेमाचे त्यांनी दिले दाखले
आईवरली ती प्रीत पाहुनी
क्षणभर गोरे ईंग्रज वाकले
ही शब्दांजली त्या हुतात्म्यांना
ज्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न दिले
मातीच्या जखमांचे ऋण फ़ेडाया
ज्यांनी वाहिली प्राण फ़ुले…
१८५७ चा ऊठावाला १५१ वर्ष पुर्ण होत आहेत. ईंग्रजांच्या अन्यायाविरुध्द बंडाला सुरुवात येथुनच झाली. त्या लढ्यात मरणाला कवटाळुन आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी लढणा-या महान आत्म्यांना ही मानवंदना. त्यांचं आज स्मरण करुन त्यांना वाहीलेली ही शब्दांजली. जय हींद !! जय महाराष्ट्र !!
–सचिन काकडे [ मे १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
मे 8, 2008 at 8:20 सकाळी (कविता)
लवती बहार आहे, तरीही नकार आहे
दडती श्वास लहरी, मनही फरार आहे
तशीच नजर लपते, नयनी तुला गं जपते
परी मी धुकेच ठरतो, मी आरपार आहे
रुसली नभात रात दिसली दिव्यात बात
जळती वातही ओली, अंधार फार आहे
आभाळ लख्ख वाजे, सखी हळुच लाजे
चांदणे घरात फिरती उघडेच दार आहे
हा कोठला प्रवास? होतो मलाच भास
क्षणीकाचीच स्तब्धता, पुन्हा थरार आहे
मदमत्त लाट येते, पाउल वाट होते
करते उरात घाव, ‘कळ’ ती पहार आहे
कळतो मलाच खेळ, छळतो मलाच खेळ
सरताच डाव हाही माझीच हार आहे
–सचिन काकडे [ मे ८,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
मे 2, 2008 at 7:03 सकाळी (कविता)
ओठात सांजवेळी तु, सुर होऊनी येते
मोजुन श्वास माझे, माझे मलाच देते !!
सरी तुझ्या स्वरांच्या आसवांच्या ओळी
ओल्या सरीसवे तु, थेंब थेंब झरते !!
या भिजल्या स्वरांना देउ नकोस साद
भास द्याया पुरे गं, माझी मलाच गीते !!
मी मोजतो दुरावे, मी शोधतो पुरावे
अंतरही हात धरुनी मजला दुरात नेते !!
तो श्वास गुंतलेला, तो सुर संपलेला
ते इशारे क्षणांचे, सारे मलाच होते !!
त्या धुंदमंद राती, तुही नशाच होती
कोरडीच नशा आज, पेले माझेच रीते !!
–सचिन काकडे [ मे २,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा