_______हार________

लवती बहार आहे, तरीही नकार आहे
दडती श्वास लहरी, मनही फरार आहे

तशीच नजर लपते, नयनी तुला गं जपते
परी मी धुकेच ठरतो, मी आरपार आहे

रुसली नभात रात दिसली दिव्यात बात
जळती वातही ओली, अंधार फार आहे

आभाळ लख्ख वाजे, सखी हळुच लाजे
चांदणे घरात फिरती उघडेच दार आहे

हा कोठला प्रवास? होतो मलाच भास
क्षणीकाचीच स्तब्धता, पुन्हा थरार आहे

मदमत्त लाट येते, पाउल वाट होते
करते उरात घाव, ‘कळ’ ती पहार आहे

कळतो मलाच खेळ, छळतो मलाच खेळ
सरताच डाव हाही माझीच हार आहे

–सचिन काकडे [ मे ८,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

Post a Comment

You must bee logged in to post a comment.