“झोल चकण्याचा”

कट्ट्यावर जमली पोर वल्ली
दोघं होती आधीच टल्ली
बाकीच्यांचे वांदे होते
खिशात होती नोट नल्ली

पिंट्या, विज्या, सम्या, मन्या
बघता-बघता पार्टी वाढली
दिन्या आमचा अकाऊंटमास्टर
नेमकीच मोजुन कॉंट्री पाडली

वश्यानं बाईकचा टाकला गियर
आणायाला निघाला वीस-एक बियर
चकण्याचा मात्र पत्ता नव्हता
दिन्याचा हिशोब लागत नव्हता

काही तरी झोल करुयात
मन्या खरच सीरीयस झाला
अब्दुल चाचाच्या कोंबड्य़ा चोरु
ऑप्शन नाहीये सांगता कुणाला?

नको-नको म्हणत सम्या उठला
अरे रावडी आहे अब्दुल चाचा
त्याला पाहुन जातेच वाचा
अरे,मागच्या वेळेला मजबुत पडली
अन तो माझ्यावरचा अन्याय पाहुन
ती एक किलोची कोंबडीही रडली

संत्या उठला काही नाही होत
आज मी व्यवस्थित फ़िल्डींग लावणार
एक दोन नको आज चौघंजण जाऊ
आपण आज फ़क्त चिकन खाणार

आवाज निघताच तयार सगळे
पण हवा सगळ्यांचीच टाईट होती
चौकात होता पार अंधार
आणि मनस्थितीही वाईट होती

तिथं चाचालाही खबर लागली
त्यानीही केलं प्लानिंग सेट
आयतेच तावडीत आम्ही सापडलो
सगळेच झालो चेक ऍंड मेट

एनवेळी कल्टी मारायला
खरतर आमचए हिरो उस्ताद होते
पण आज पडलेल्या पहील्या बॉलवर
धावा शुन्य अन दोन गडी बाद होते

पिंट्या सापडला, रव्याला तोडला
दिन्यालाही निबार हाणला
हे वादळ थांबणार नाही
सत्यानही नेमका मुद्दा जाणला

सम्याला तर पार फ़ोडला
शर्ट फ़ाडुन तसाच सोड्ला
सम्या नुसता कण्हत होता
साल्यानं माझा दात पाडला
असं काहीतरी म्हणत होता

मोडुन सारे वीर परतले
कट्ट्यालाच टेकुन बसले
एकेकाने बीयर घेतली
विदाआऊट चकना घश्यात ओतली

एफ़ एम लावत वश्या हसला
साला चकण्यासाठी साठी एवढा मार
रव्याचा सुर “च्यायला बघ ना”
बॅअकग्राउंड्ला म्युझिक नमस्ते लंडन
चकना, चकना,, चकना………

–सचिन काकडे [ मे १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

Post a Comment

You must bee logged in to post a comment.