___.उधळते मन.___


मन नेहमीच अस्थिर
अगदी गोंधळलेल्या वाटांसारखं…
थोड्याश्या साशंक तरीही
मस्तीत उधाणत्या लांटासारख….
किना-याला छेदुन पुढं
निघण्याचा उगाचचा प्रयत्न…
धरेच्या पदराला स्पर्श करुन
गगनास भिडण्याचं वेगळंच स्वप्न…
अन, तेव्हाच नकळत समोर येतो
तोच नेहमीचा व्यवहारीकतेचा प्रश्न…
खरेपणाचा, वास्तवाचा…
आपल्या दुनियेत कीतीही
धुंदीत उधळलं तरी लाटांना
इथं थांबावच लागतं……
पुनवेच्या चंद्राची मर्जी राखुन
त्या फ़ेसाळत्या शांततेत
त्या अस्वस्थेत जागावं लागतं…..
लिहुन ठेवलेल्या नियमांच्या,
बंधनाच्या त्या कड्यात
ती असह्य वाहत राहते…
बंधनांचं ते जुलमी वागणं फ़क्त
मुक्या नजरेने पाहत राहते…
अजुनही ती अशीच जगते
क्षणभर का होईना पण
निर्मळ मनानं स्वप्न बघते
तर मग या वेड्या
मनांच एवढं काय वेगळं ?
तेही असचं कधीना कधी थांबत
नकळत तेही या बंधनात अडकतं..
तरी आपल्याचं नशेत उधळतं

अन, मुद्दामच या लाटांचा हात धरतं…..

–सचिन काकडे [ मे २२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

१ प्रतिक्रिया

  1. वाचून बघा म्हणाले,

    मे 27, 2008 at 3:46 pm

    Excellent, beautifully worded !

    I’ve always enjoyed reading you, please keep writing.

    Best regards,

    Satish Waghmare


टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.