तुज एकांती स्मरताना
सावल्या लागती मागे
निस्तब्ध होतसे सांज
तुटतात सावळे धागे
सावल्या लागती मागे
निस्तब्ध होतसे सांज
तुटतात सावळे धागे
तुटण्याची सुन्न भाषा
सहज मलाही कळते
आलिंगन गहिवरलेले
डोळ्यातुनी पान गळते
दचकुनी थांबतो वारा
त्याच्याही येते ध्यानी
मघा उडविला पाचोळा
राहिले तसेच पाणी
पाण्यातुनही अंधार
ना ओल दिसे ना दिवा
दग्धता गुढ तळाशी
शोधत फिरे काजवा
ती भिरभिर फिरताना
चांदणे येतसे खाली
सरकती मेघही पुन्हा
अंधार पुन्हा भवताली
या अंधारातही कैसा
कवितेला हट्ट सुचतो
“स्वरनक्षत्र” मागते भोळी
माझाही तोल सुटतो
–सचिन काकडे [ जुलै १३,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
