तुझ्या पापण्यांना रंग देउ मी कुठले?

तुझ्या पापण्यांना रंग
देउ मी कुठले…?
जरा स्पर्श होता
तु डोळेच मिटले…?

निथळले रंग सारे
मी घट्ट बांधलेले…
त्याच रंगात होते
मी हट्ट सांधलेले…
सांग ओलावले का ?
रंग सारे तुझेही…
तप्त आभाळ सांग
का डोळ्यात भिजले?

विझलेत दिप सारे
विजांची उन्हेही…
दिले रंग मजला
जरासे तिनेही…
तो रंग चांदण्याचा
जरी त्यात होता
थेब अता मोजकेच
या ओठात उरले….

ओल श्वासातुनी
ऋतु गार वाहे…
तुझ्या नेत्री तरी
का अंधार आहे…?
सांग पाहिलेस का?
मघा तु मलाही…
रंग माझे तुझेही
का गालात हसले…

–सचिन काकडे [ जुलै १७,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

१ प्रतिक्रिया

  1. Abhijeet म्हणाले,

    ऑगस्ट 2, 2008 at 2:57 pm

    Sundar..!
    Abhijeet
    http://dilkhulas.wordpress.com


टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.