मन भिरभिर करी…
रान भिजलया तरी…
सांज अंगणी येईना
उन विझलया तरी…
रान भिजलया तरी…
सांज अंगणी येईना
उन विझलया तरी…
सख्या थांब ना…जरासा
का रे ओठावर घाई?
तुही थांब ना…पावसा
का रे बरसत जाई?
सा-या अंगातुनी चळ
कसा… निथळु लागला?
सख्या कर ना.. ओंजळ
थेंब वितळु लागला….
थेंबा-थेबातही प्रश्न…
प्रश्न, श्वासातुनी..येती
चिंब हुरहुर नवी….
स्पर्श, उत्तर मागती..
दोन क्षणांच आभाळ
सख्या मला रे…पुरेना
कळे पावसाला सारे
का रे….तुला ते कळेना?
का रे…थरथर येते
जरी पदर धरला?
का रे…जुलमी विजेने
मेघ दिशेत भरला….
मेघ फिरे देहभर…
चांद ओघळत राही…
थेंब”स्वरनक्षत्रांची” भाषा
सांगे तुला,… मलाही….
–सचिन काकडे [ ऑगस्ट ६,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे

shrikrishnasamant म्हणाले,
ऑगस्ट 8, 2008 at 1:57 सकाळी
फार सुंदर कविता आहे. वाचायला मजा आली.