काळ म्हणतात ना तुला..

जगायला शिकलो…
हसायला शिकलो…
भलेभले डाव पाहिले
फसायला शिकलो…
शिकलो फक्त मीच
जगलो फक्त मीच
फसतानाही तेव्हा…
हसलो फक्त मीच
रोजचं जगणं आहे..
रोजचं हसणं आहे..
तुझ्या डावामागोमाग
रोजचं शिकणं आहे…
हो रे जुगारी, जुगारीच मी
होतो, आहे, आणि राहणार….
तुझ्यावरही मी नेमका
त्याचवेळी डाव खेळणार….
काळ म्हणतात ना तुला..
मीही बोलतोच आहे….
दोन शब्दांपुरतं मी तुला
उगा मनी तोलतोच आहे….
तु म्हणजे सत्य,
तु, तुच ना रे अंत…
प्रारंभ तो बावळा
फक्त तुच का रे संत…?
माझ्यासाठी मीच रडलो..
माझ्यावर मीच हसलो…
ओलाव्याशी नातं तुझं
मी नेमका तिथंच फसलो…
अरे, हा माझा, तो माझा
असं कुणीच रे नाहिये माझं…
ओजंळ तेवढी आठवस्वरांची
तेवढं मुठभरचं रे माझं ओझं…
तु म्हणशील त्या वेळी
नक्की मी तुझ्या कवेत असेन….
मात्र, स्वर उधळताना नक्षत्री
नक्कीच मी त्या हवेत असेन…

—एस. के…..S.K. only….