जाउ नकोस…
मी अडवत नाहीये तुला…
तुझ्या पावलांना…
या पावसांच्या थेंबाचं
एकमेकांशी बोलणं संपु दे…मग जा
तोपर्यंत थांब्…
थांब मला ऐकवायच्या आहेत
या सरी…तुला..तुझ्यावर लिहिलेल्या
मघाशी जेव्हा तु..सावळं आभाळ
माझ्या हातात दिलंस
तेव्हाच मी
हा..पाउस त्यावर लिहिला होता
जरा थांब…थांब जरा
या सरींना ओलांडुन जाउ नकोस
‘आठवण’ राहणार नाही
तुला..‘या पावसाची’
मी अडवत नाहीये तुला…
तुझ्या पावलांना…
या पावसांच्या थेंबाचं
एकमेकांशी बोलणं संपु दे…मग जा
तोपर्यंत थांब्…
थांब मला ऐकवायच्या आहेत
या सरी…तुला..तुझ्यावर लिहिलेल्या
मघाशी जेव्हा तु..सावळं आभाळ
माझ्या हातात दिलंस
तेव्हाच मी
हा..पाउस त्यावर लिहिला होता
जरा थांब…थांब जरा
या सरींना ओलांडुन जाउ नकोस
‘आठवण’ राहणार नाही
तुला..‘या पावसाची’
जा जायचे आहे तुलाही,
हृदयातले तुडवुन पुर..
ठेवायचे आहे मलाही,
ओठावरी अडवुन सुर….
नाहीच गाण्यासारख्या
हाकेतल्या माझ्या विजा
ऐकु नकोस…, ‘थांबशील
माझाच मी ऐकतो, जा….
जा जायचे आहे….१
तशी मुक्याने बोलते
तुझी अव्यक्त सावली
बोलु नकोस, सांगशील
माझाच मी पाहतो,.. जा…
जा जायचे आहे….२
विसरतो आहे तुला
विसरलो अन हरवलो
विसरु नकोस, शोधशील
माझाच मी शोधतो, जा…
जा जायचे आहे….३
पावसाला आताच आली
सर कशी बरसायची..?
विचरु नकोस, न्हाहशील
माझाच मी सांगतो, जा…
जा जायचे आहे….४
जाळतो आहे असाही
पाउस ओला श्वास माझा
थांबु नकोस, वाहशील
माझाच मी वाहतो, जा…
जा जायचे आहे….५
— एस. के…..[ ऐक तु पाउस जरासा...]
