वास्तवाच्या स्विकराचा धडा आता झालाय तोंडपाठ,
पण ………तरीही तुझ नसन असतच आसपास,
अंतरी असतो नुसता रिता कल्लोळ,
कधी कधी जीवघेणी कळ,
तर कधी विजेचा आर्त लोळ,
कधी कधी तर एक अंत,
अन त्यात सुचलेला एकांत
तिथुन सुरुवात “तुझी”
तुझ्यासकट जमलच
तर मलाही
मी लिहीत गेलो
अन, तुझं नसणंही
सरतेशेवटी जाणवलं
‘तु नसणं’
तेही प्रस्तावनेत ?
नसण्याच्या आधी
असण्याच्या कथा
तुलाही आवडायच्या
मग
वहीचं ते मागचं पान
तसचं ठेवुन
मी पहिल्या पानावर आलो
हसत असशील ना?
” या शेवट”च्या पानांवर लिहायची
माझी सवय अजुन गेली नाही……
–सचिन काकडे
