अंगावरला उन्हाचा साज
उतरवुन समोर आली यौवना
म्हणालो “सांज” तिला…
नको छळु मनास्…आवर पदरास…
वारा कुजबुजला “सांग तिला”..!!
तु अशी येताना…थरथरताना….
सावल्या का गं सभोवती ?
तयांचे फितुर गीत, कहाणी तयांची
का तुला गं माहीत नव्ह्ती?
तुझा स्पर्श सांगतो असे मला की
तुज रात व्हायचे आहे…
तु रात हो…वा हो पहाट
मज तुझे व्हायचे आहे…..
तु कशास चोरते अंग, मनाचा रंग…
कसलासा हा गं बहाणा….
ओठावर फुलते गीत….बहरते प्रीत
तु ये अशी..गं तु मिठीत ये ना…
—–एस. के……मी इथेच्…आहे….आणि असणार….
[ जानेवारी १६,२००९]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
उतरवुन समोर आली यौवना
म्हणालो “सांज” तिला…
नको छळु मनास्…आवर पदरास…
वारा कुजबुजला “सांग तिला”..!!
तु अशी येताना…थरथरताना….
सावल्या का गं सभोवती ?
तयांचे फितुर गीत, कहाणी तयांची
का तुला गं माहीत नव्ह्ती?
तुझा स्पर्श सांगतो असे मला की
तुज रात व्हायचे आहे…
तु रात हो…वा हो पहाट
मज तुझे व्हायचे आहे…..
तु कशास चोरते अंग, मनाचा रंग…
कसलासा हा गं बहाणा….
ओठावर फुलते गीत….बहरते प्रीत
तु ये अशी..गं तु मिठीत ये ना…
—–एस. के……मी इथेच्…आहे….आणि असणार….
[ जानेवारी १६,२००९]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
