___तुलाही वाटत असेल ना?___

जरा विसरावा
संध्येचा प्रहर..
वेगवेगळं शहर..
तुझं-माझं घर.

तुलाही वाटत असेल ना?

घराच्या भीती..
भीतींवरली भीती.
काळ्या बाहुल्यांची..
खुळ्या सावल्यांची

तुलाही वाटत असेल ना?

सावलीत यावसं.
मला पहावसं..
डोळ्यांच्या नभात
पाउस व्हावसं..

तुलाही वाटत असेल ना?

थेंबाची मिठी
थरथरत्या ओठी
ओठांनी ओठानां
घट्ट मिटावं

तुलाही वाटत असेल ना?

सारं विसरावं
क्षणिक स्पर्शात
ओल्या आरश्यात
तुला मी दिसावं

तुलाही वाटत असेल ना?

काहितरी सुचतय
तुला मी सुचावं
मला तु सुचावं
मी तुला लिहावं

तुलाही वाटत असेल ना?

-एस.के. [मला वाटलं.... मी लिहिलं.....]

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.