पुन्हा सावल्यांना
जुना खेळ सुचला..
भंगल्या स्वरांचा
पुन्हा गाव रचला..
जुना खेळ सुचला..
भंगल्या स्वरांचा
पुन्हा गाव रचला..
वा-याने पळविली
सन्यस्ताची झोळी
उमटल्या धुळीत
तिच्या दोन ओळी
पहिली ओळ….
निशब्द..खाणाखुणा
दुसरी ओळ…..
शब्द,शब्द….’ती’ पुन्हा
ओलं पाउल….
आभाळ पाहिलं
तिचं गाणं..
तसचं राहिलं..
पुन्हा मागे…पुन्हा धागे….
पुन्हा बंध..पुन्हा गंध
ओल्या वातीचा…
तिच्या रातीचा…
लिहित गेलो…’ति’ला…
तिसरी ओळ
निशब्द..’मी’ जुना
चौथी ओळ…..
शब्द,शब्द..’कविता’ पुन्हा
—एस.के. [पुन्हा 'ति'च्या नशेत...]
