____गीतसंध्या____

विरल्या सुरात गातो
दाही दिशेस गाणे
ओल्या स्वरफुलांना
का कोरडीच पाने?

हे एकलेच अंगण
अंधार गर्द साचे
दिव्यात आर्त गीत
गाउ कुणाकुणाचे

धरला मुठीत दिप
विझलाच जन्म सारा
वाहे तरी उगाच
स्मरणांसवेत वारा

आहे धुरात कविता
त्याला जरा कळु दे
विझली उरात तरीही
हातात ती जळु दे

सरणार गीतसंध्या
उरणार श्वास थोडे
कळणार कसे तुलाही
अंतास शब्द वेडे

—एस. के. [ चल विझलेल्या स्वप्नांची..राख जराशी चाळु]

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.