____ती आणि पाउस_____

तिचं नितळ हसणं पाहुन..
क्षणभरचा स्वर्ग
कसा असतो ते कळालं..
ती हसली पण….
मलाच फुलल्यासारखं झाल
नकळत…..
पावसाची हलकी सर
तिच्या डोळ्यात,
डोळ्यातुन गालावर,
माझ्या ओंजळीत,
भिजु लागली…
ती..,
नजर…,
तिचा हात..
सोन-सावळं आभाळं,
आभाळातला स्वर्ग,
अन,
त्याच्या दारतला मी…
काही कळत नव्हतं…..
माझा हात घट्ट धरत…
तिनं पाउस थांबवला…
तो थांबलाही…पण
पापण्यांशी ओलावा होता
त्याहुनही जास्त काळजात
तिच्या अन माझ्या…
या जन्मासाठी….
क्षणभराचा का होईना
पण स्वर्ग पाहिल्यावर..
थोडा पाउस हवाच ना??

एस. के. [ ती आणि पाउस्....फक्त भिजत होतो]

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.