____संध्येपारचा जोगी_____

तो संध्येपारचा जोगी
दिसतोच तळ्याच्या जागी

नभ त्याच्या पंखाखाली
पंखात केशरी शाली

ती भगवी मखमल माया
स्पर्शात झुलविते काया

नजरेत उतरते आग
ओलासा घेउन राग

संध्याही शोधे तिजला
संध्येने जोगी भिजला

ती ओली व्याकुळ राख
मुठीतुनी उमटे हाक

हातात कोवळे पाणी
हे अर्घ्य कुणाची देणी?

ती राख तळ्याला देता
देहाची फुलते कविता

कवितेत तयाची आई
संध्येस कळाले नाही

—-स्वरऩक्षत्र [एस. के.]…..[तो अजुन क्षण तो समोरी

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.