मी घर-घर खेळत होतो
घर बांधायला घेतलं
जागा सापडत नव्हती
खुप-खुप शोधलं
जागा कुठे मिळेचना
काय करु कळेचना
शेवटी मी माझं घर
माझ्याच ‘मनात’ बांधलं
पण..
माझ्या घरी राहायला
कुणी तयारच होईना
कुणी डोकावुनही पाहिना
खुप्-खुप्-खुप वाट पाहिली
अखेर मीच माझ्या
त्या घराला आग लावली
आग विझली…धावत सुटलो
घरांपासुन, गावांपासुन
वेस सोडली, विस्कटलेल्या..
किना-यावर आलो
आता इथंच खेळतो
इथल्या वाळुशी माझं छान जमतं
तिलाही आकार नाही
आणि माझ्या घरालाही
— स्वरनक्षत्र [एस. के.]….
घर बांधायला घेतलं
जागा सापडत नव्हती
खुप-खुप शोधलं
जागा कुठे मिळेचना
काय करु कळेचना
शेवटी मी माझं घर
माझ्याच ‘मनात’ बांधलं
पण..
माझ्या घरी राहायला
कुणी तयारच होईना
कुणी डोकावुनही पाहिना
खुप्-खुप्-खुप वाट पाहिली
अखेर मीच माझ्या
त्या घराला आग लावली
आग विझली…धावत सुटलो
घरांपासुन, गावांपासुन
वेस सोडली, विस्कटलेल्या..
किना-यावर आलो
आता इथंच खेळतो
इथल्या वाळुशी माझं छान जमतं
तिलाही आकार नाही
आणि माझ्या घरालाही
— स्वरनक्षत्र [एस. के.]….
