सांग माये सांग आता
खरा देव गं कोठला?
मला दिसतही नाही
तुला कसा गं भेटला?
खरा देव गं कोठला?
मला दिसतही नाही
तुला कसा गं भेटला?
दारी उभा होता जोगी
मंत्र होता ओठामध्ये
भाकरीची आस, भक्ती
झोळी होती पोटामध्ये
जसा मिळाला गं घास
तशी सरली गं आस
त्याची सरताच भुक
देव ओठातला मुक
सुख सापडले अन,
मंत्र अंतरी गोठला
सांग माये सांग आता
खरा देव गं कोठला?
काल होतो गं काठाशी
मंत्र तिथंही गं होता
डोळ्यातल्या पाण्याने
देव मागितला होता
दिली सरणाला आग
तिचा देवावर राग
तिनं देव विझवला
खोल आत निजवला
माणसात माणसाचा
उभा देह गं पेटला
उभा देव गं पेटला
सांग माये सांग आता
खरा देव गं कोठला?
—-
—— एस. के [............................]

fightandlight म्हणाले,
ऑगस्ट 13, 2009 at 5:02 pm
namasmran kar manje dev kharokar disel