____कधी ना कधी____

कधी ना कधी तु येशील तेथे
मला कविता सुचते जेथे..॥

सांज तेथली असे कोवळी
दिसे जराशी निळी-सावळी
भिर-भिर फिरते..
अन, लहरी धरते…
ओंजळ भरते..
त्या थेंबानी
अर्घ्य स्म्रुतींचे
निळ्या सागरा लिहुन देते…
खुळ्या मनाचे लिखाण जेथे…
कधी ना कधी तु येशील तेथे…॥

तिथे आठवे तुझा किनारा..
अबोल वारा, जरा शहारा..
उगाच पाणी..
डोळ्यांमधुनी..
तुझी कहानी.
त्या एकांतातुन
वेडी संध्या
तुझ्याविना का तुला वाचते?
जिथे अंतरी ओल साचते
कधी ना कधी तु येशील तेथे…॥

-एस. के [तु सुचतेस अशी मज कधी कधी]

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.