नितांत सुंदर, कोवळ काया
उभी दिव्यावर घर सजवाया ।।
हे घर माझे या माझ्या भिंती
तुझ्याविना या मुक्याच अंती ।।
बेफ़िकिरच उघडे दार मनाचे
हे उभे तयाशी वार कुणाचे ? ।।
सांग किती या जखमा झेलु
कितिदा तुझ्याशी असाच बोलु ।।
थरथत्या नजरा सावर आता
लवलवत्या ओळी सांगे गाथा ।।
मज असा दुख:चा अर्थ कळाला
अन दिसे देवही त्याच तळाला ।।
मी त्याच जुन्याश्या प्रथा पाळतो
मी माझ्यासाठी तुला जाळतो ।।
मी तुला जाळूनी जगतो आता
परी तुझ्यात येईन जाता जाता ।।
-एस. के. [अंधार जाळती तुझीच कांती]
