स्मृतीच्या तळ्याशी उतरते निळाई
तशी नील-नयनी मज सुचते रुबाई ॥
जरा पायी हलतात, अस्वस्थ पाने
तुझा स्पर्श होतोच, या जाणिवेने ॥
शहा-यात अक्षर अन अक्षरी तरंग
तयातुन द्यावा, मी तुजला हा रंग ॥
अव्यक्त निळाईत तुझे व्यक्त होणे
डोळ्यात लाजणे, क्षणात दुर जाणे ॥
“तुझाच श्वास माझ्यात अद्याप आहे
मी तुजला लिहावे तुझा शाप आहे”
सुर हा जुनासा, तळ्यातुनी उमटतो
हसतेस दुरुनी श्वास सुचताच तुटतो ॥
जसा जीव जातो, तुझ्या या अदेने
तसे पुर्ण होते, हे गीत जीवघेणे ॥
–एस. के. [जन्म जाईल माझा तुला रंगवुनी]
