____देव..माणुस शोधताहे___

माणसाचा देव व्हावा, फक्त इतुके होउ दे !!
माणुसधर्म सर्वलोकी, भक्त इतुके होउ दे !!

मी देव बोलतोय..
मी तुझा धर्म….तुझ्यातला…..
तुला वंदनीय, पुजनीय….
दशदिशेला तु मला शोधतोस
तुला अजुनी शोधच आहे माझा…
शोधताना तु तुझ्यासाठी तुझ्या रेषेत
तुझ्या अक्षरांवर धर्मा-धर्माने
तु वेगळं करत गेलायस मला..
पण माझा आजही तुझ्यावर राग नाही…
ना तुझ्या भक्तीवर
तुझ्या श्रध्देवर माझा आरोप….
तु म्हणतोस म्हणुन मी आहे..आहेच….
पण तु मानलस तरच मी..
तेव्हाच मला अस्तित्व…
त्याउलट तु निर्विवाद सत्य …
अरे जरी देव मी…
तरी माझा देह तु..
तु तुझ्यातुन मला पाहत आलास
पण कधी तुझ्यात पाहिले नाहिस.
.तुझ्याच आतला आवाज मी
आज तुझ्यातुन येतोय्
होय मी देव बोलतोय…
“अरे माणसा माणसा कधी व्हशील माणुस”
थोर कवियत्री बहिणाबाईंच हे सांगणं…
एक गाणं म्हणुन ब-याचदा
एक रसिक म्हणुन ऐकत असशील…
अंतराच्या लाख तारा छेडल्या असतील
त्यातल्या संगीताने पण
कधी या सुरांपलीकडे जाउन
स्वरांचा अर्थ लावलास कधी?
नसेल कदाचित..
माणसाने किती सांगितल तरी
माणुस ऐकेल हे झाल नाही पण
जर देव म्हणजेच मी बोललो
तर तु ऐकतोस हे मी कित्येकदा ऐकलय्…
.म्हणुन आजपासुन तुच देव हो
हे आज मीच तुला सांगतोय
होय मी देव बोलतोय…
खुप भांडलास…लढलायस माझ्यासाठी..
अगदी रक्ताळलेल्या देहाने
ज्या-त्या ठीकाणी अजुनही
माझी काया तु पावन ठेवत आलायस..
.पण त्याने तुझ्यातल्या मी अन
माझ्यातल्या तु
दोघेही कलंकितच ठरत आलो..
आता तु मी हो, मी तु होतो…
आज तुझ्या त्या रक्तासाठी,
मी माझ्या भक्तासाठी…
तुझ्यासाठी…
तुझ्या “माणुसकि”च्या धर्मासाठी
तुझ्याकडे फक्त इतकच मागतोय्.
होय मी तुझा देव बोलतोय…

अरे, त्रिभुवनी तु सर्वलोकी मी तुझ्यातच राहतो
तुच हो रे देव माझा, मीच तुजला सांगतो..!!
धर्मातलाही एक धर्म रक्ताशिवायही वाहतो
भक्त हो तु माणसांचा फक्त इतुके मागतो

—एस. के. [ देव-माणुस शोधताहे॥]

3 प्रतिक्रिया

  1. आल्हाद alias Alhad म्हणाले,

    नोव्हेंबर 13, 2009 at 11:09 सकाळी

    काकडेबुवा

    उत्तम लिहीलंत!

  2. akhiljoshi म्हणाले,

    नोव्हेंबर 25, 2009 at 6:14 सकाळी

    apratim…………..
    atishay sundar..
    visit my blog @ http://www.akhiljoshi.wordpress.com

  3. aniketkhadke म्हणाले,

    जानेवारी 17, 2010 at 12:24 pm

    khup chan lihilay! keep it up!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.