डिसेंबर 16, 2010 at 10:27 सकाळी (कविता)
जिथे उतरली सांज,
तिथे लागला किनारा
कुणी सोडल्या सावल्या
कुणी सोडलेला वारा
कुणी गेलं आभाळाशी
त्यांनी पेटवली चुल
गेलं रांगत कुशीत
भीत काळोखाच मुल
फ़ेसाळल्या लांटांवर
कुणी धुतं ताटवाटी
कुणी पेटवली भली
जुन्या यादेत शेकोटी
त्या वरच्या चुलीत
शिजु लागलं चांदणं
अन भाकरीचा चांद
कोर धरुन थापणं
उभ्या डोंगरा पल्याड
कुणी पेटविला दिवा
जरा लावुनिया ध्यान
त्यानं मंतरली हवा
जरा जरा आडोशाला
कुणी वेचतय फ़ुले
तिथं म्हातारी सावली
गोष्ट ऐकायला मुले
वारा धरुन उराशी
गुणगुणते कुवारीण
भल्या पहाटे साजण
असा मिठीत घेईन
बाप तयांचा दिसे
उन थकला दिवस
दिवा विझवुन करे
जणु रातीला नवस
असा दिवसही चाले
सारा घेउन संसार
त्याला लागते रे उन
अन हवाच अंधार
–एस. के. [जरा पल्याड जाउन....]
प्रतिक्रिया नोंदवा
डिसेंबर 16, 2010 at 10:25 सकाळी (कविता)
गेले कित्येक दिवस
शोधतोय मी
स्वत:लाच
माझ्यात,
घरात,
ऑफ़िसात,
अगदी
भर रस्त्यात,
गर्दीत,
मित्रांत,
शब्दांत,
’ति’च्यात
सापडेनासाच झालोय
मी स्वत:लाच
शोधतोय
गेले कित्येक दिवस
-एस. के. [ सापडलो तर नक्कीच पुन्हा.... भेटु पुराव्यांसकट ]
प्रतिक्रिया नोंदवा
डिसेंबर 3, 2010 at 9:37 सकाळी (कविता)
आखरी पन्नोपे शायद कुछ लिख रहा है आसमा
की तयाच्या डोळ्यांवरी जणु पाखरे, झाली जमा
आसमंताच्या तळाशी अशात खळबळ होते पाणी
उससे जल जाते ये पन्ने, पन्नो की तेरी कहानी
जल रही शाम आखिर जलता हुआ उसका ये तन
केशरी श्रुंगार मखमल उरी वाजवी हलकेच पैंजण
ऋण-झुण हे इशारे पुन्हा, का कशाला याच प्रहरी ?
तेरी भी थी कुछ वो बाते इससे हलकी, इससे गहरी
तब बुझी ती शाम शायद, तब जरासा था धुंआ
त्याचवेळी घात झाला अन नेमकी विझली हवा
त्या धुक्याच्या पार होता या अक्षरांचाच आत्मा
आखरी पन्नोपे शायद कुछ लिख रहा है आसमा
—एस. के. [ पन्नो की ये तेरी कहानी ]
प्रतिक्रिया नोंदवा