जिथे उतरली सांज,
तिथे लागला किनारा
कुणी सोडल्या सावल्या
कुणी सोडलेला वारा
तिथे लागला किनारा
कुणी सोडल्या सावल्या
कुणी सोडलेला वारा
कुणी गेलं आभाळाशी
त्यांनी पेटवली चुल
गेलं रांगत कुशीत
भीत काळोखाच मुल
फ़ेसाळल्या लांटांवर
कुणी धुतं ताटवाटी
कुणी पेटवली भली
जुन्या यादेत शेकोटी
त्या वरच्या चुलीत
शिजु लागलं चांदणं
अन भाकरीचा चांद
कोर धरुन थापणं
उभ्या डोंगरा पल्याड
कुणी पेटविला दिवा
जरा लावुनिया ध्यान
त्यानं मंतरली हवा
जरा जरा आडोशाला
कुणी वेचतय फ़ुले
तिथं म्हातारी सावली
गोष्ट ऐकायला मुले
वारा धरुन उराशी
गुणगुणते कुवारीण
भल्या पहाटे साजण
असा मिठीत घेईन
बाप तयांचा दिसे
उन थकला दिवस
दिवा विझवुन करे
जणु रातीला नवस
असा दिवसही चाले
सारा घेउन संसार
त्याला लागते रे उन
अन हवाच अंधार
–एस. के. [जरा पल्याड जाउन....]
